Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Vijay Sanap

Tragedy


1  

Vijay Sanap

Tragedy


देव माणसात

देव माणसात

1 min 424 1 min 424

देवा पांडुरंगा / काय केला गुन्हा

आटला रे पान्हा / आज तुझा ।।

जलमय झाला / सारा परिसर

बुडालं छप्पर / पाण्यामधी ।।

कृष्णा,पंचगंगा / दोन्ही ही कोपल्या

घरात नाचल्या / अंदाधुंद  ।।

आला महापूर / घातले थैमान

येऊन सैतान / मनमाने ।।

वाहिला संसार / चुल विझली

धरनी लाजली / पाहूनीया ।।

गेलीया समोर / गोठ्यातली गाय

वासराची माय / पुरामंधी ।।

असा कसा देवा / साधला रे डाव

नाही आली किव / जरा शीही ।।

शेतातल पिक / वाहून रे गेलं

तण ते राहील / बांधावरी ।।

देव माणसात / आज मी पाहिला

धावून तो आला / संकटात ।।


Rate this content
Log in

More marathi poem from Vijay Sanap

Similar marathi poem from Tragedy