देशनिष्ठा
देशनिष्ठा
ध्येय स्वातंत्र्य प्राप्तीचे
मनी तयांच्या रुजले
जन जागृती करण्या
दिन रात्र ते जगले
जिद्द होती स्वातंत्र्याची
मिळवीन ते स्वातंत्र्य
हक्क दावी इंग्रजांना
घालविण्या पारतंत्र
त्याग देशनिष्ठा हीच
कामे धरुनीया हाती
क्रांति वीर ते लढले
देत प्राणांची आहुती
समाजाची सुधारणा
याचा मार्ग शिक्षणात
शाळा राष्ट्रीय काढल्या
ज्ञान देण्यास जनात
देशनिष्ठा भरलेली
मने तयांची ठासून
चैन न पडे जीवाला
क्षण एक त्या वाचून
दुर्लक्षित तो संसार
स्वातंत्र्याचा मनी ध्यास
तुज नमो क्रांति वीरा
जन्मभर एक आस