दे ना उत्तर...
दे ना उत्तर...
मी वेडीच आहे हो ना...!
तुझ्यावर एवढं जीवापाड प्रेम करते
अन् तू नेहमीच मला अस टाळतो
मग का मला चोरून चोरून
पहातो...
घायाळ करतोस नजरेनं मला बसल्या जागी...
तू नाही दिसलास दिवसभर तर
मन पण कुठ लागत नाही...
फितूर होत माझच मन माझ्याशी
तुला टाळायचं म्हणते..
अन् फक्त तुझाच विचार करत बसते..
एवढं पण माणसांन हट्टी नसावं
आपल प्रेमाचं माणूस आपल्या
समोर असूनही...
त्यानं अस अंतर ठेवून नाही वागणं
हे दुःख देवा कोणाच्या वाट्याला न यावं...
दे ना आता तरी उत्तर...
मरतोस ना माझ्यावर कर ना मग कवबुल
एखाद्याला एवढं पण नाही छळावं...
की त्यानं नुसतं अस झुरत बसावं...

