STORYMIRROR

Nilesh Jadhav

Romance

3  

Nilesh Jadhav

Romance

दाद दे...

दाद दे...

1 min
239

कुठून करावी सुरुवात

समजतच नाही...

सोडली साथ शब्दांनी 

बघ ना काही केल्या कविता जुळतच नाही...


आठवले मी तुझे हसणे

आणि मृगनयनी डोळे...

आठवले मी तुझे सौंदर्य 

तरीही नाहीच शब्द जुळले


कोठे हरवलेत हे शब्द

आता कळेनाच काही...

तुझ्याशिवाय दुसरं

मला सुचतच नाही...


हरवलेल्या शब्दांना 

तुच आता साद दे...

नकळतच का होईना 

तयार झालेल्या या कवितेला तुच आता दाद दे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance