STORYMIRROR

Vijay Deshpande

Romance Tragedy

3  

Vijay Deshpande

Romance Tragedy

चतकोर भाकरी ती - [गझल]

चतकोर भाकरी ती - [गझल]

1 min
13.3K


वृत्त- आनंदकंद 

चतकोर भाकरी ती त्याच्या करात आली 

गेली शिवी मनीची ओवी मुखात आली..

रागात ती तरी पण थोडी हसून गेली 

हळुवार पावसाची जणु सर उन्हात आली..

माळून खास आली का मोगरा सखी तो

साधावयास कावा गनिमी मनात आली..

चाहूल लागली त्या चंद्रास तारकेची

निद्रेत तत्क्षणी का स्वप्नात गात आली.

आसूसलो किती मी ऐकावयास कौतुक 

श्रद्धांजलीच कानी एका सुरात आली .

.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance