चंद्रमुखी
चंद्रमुखी
सखे तुझा गोरा रंग
आणि डौलदार तनया..!
पाहतच मनी दाटे
जिव्हाळा, प्रेम , माया ..!!
तुझ्या कपाळावरची बिंदी
जणू प्रभातीचा सूर्य..!
मनभावन लावण्य तुझे
वर्णू कसे अमूर्त सौंदर्य..!!
गुलाबी मोहक गालावर
अनुपम सुंदर खळी..
अंगभर लाल साडी
त्यावर तंग रुपेरी चोळी..
रसाळ ओठ भासे
जणू गुलाबाची पाकळी..!
मोकळे रेशीम केसांटली
बट घेई माझा बळी..
डोईवरच्या पदरात लपवते
हसरा लाजरा चंद्रमुखी चेहरा..!
तुला पाहताक्षणी जीव
होतो माझा कावरा बावरा..!!
उभा मी केव्हाचा सखे
करुनी बाहुपाशाचा हार..!
तू जवळ ये ना प्रिये
जीव गुंतलाय ग फार..!!

