STORYMIRROR

Nirmala Shinde

Romance

3  

Nirmala Shinde

Romance

*चंदेरी रात्र*

*चंदेरी रात्र*

1 min
383

चंदेरी रात्री मी, तुला शोधत राहते  

ढगाच्या आड गेलेला चंद्र पाहते 

लुक लुकनाऱ्या चांदण्यात शोधते,

चंदेरी रात्रीचा मनोरम गारवा लोभवतो 


थंड वाऱ्याची झुळूक मंज शहारते, 

दाट धुक्याची शाल अंगी लपेटते

चंद्राच्या कोवळ्या किरणांनी रात्र गोंजारते,

चंद्रा सोबत चांदणी असते


नजर तव प्रेमाची मज उरी मोहरते

चांदण्या रात्री हे स्वप्न आहे.         

की भास हे न मज उमगते

दाट धुके मज सागरा सारखे भासते


चंदेरीरात्रीला चंद्रासवे टिपूर चांदणे

कानात हळूच गुण गुण करतो वारा

सर्वत्र सुगंध गंधित करतो मोगरा

चंदेरी रात्री वाऱ्या सारखी हिंदोळते

स्वप्न आहे की भ्रम मज न समजते


प्रेमाने धरिला तू माझा हातात हात, 

ओठांच्या पाकळ्यात दडले स्मित

चंदेरी रात्रीत आपली प्रीत हृदयस्त

मंदप्रकाशात ऊब प्रेमाची सुखावते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance