चंचल मन
चंचल मन
चित्र विचित्र नक्षीने
नटलेले पंख सुंदर,
स्वच्छंदपणे उडताना
मोहक दिसे फुलांवर..१
मनाचेही असेच होई
भाव भावनांनी नटलेले,
स्वैरपणे बागडताना
जीवन रसात फुललेले..२
फुलपाखरू मन माझे
रंगीत मनोहर पंखाने,
चंचल होऊन सहज फिरे
चोहीकडे आनंदाने..३
रस जीवनाचा चाखताना
विविध अनुभव येई,
फुलझाडांवर बागडताना
आस्वाद मधांचा घेई..४
फुलपाखरू बनून हवेत
तासनतास उडत राहू,
इंद्रधनुष्याच्या रंगांना
सहज जवळून पाहू..५