STORYMIRROR

Rajendrakumar Shelke

Children

3  

Rajendrakumar Shelke

Children

चिमणीबालगीत

चिमणीबालगीत

1 min
295

चिव चिव करीत

चिमणी आली,

एक दाणा असा

टिपून गेली.


मला पाहुनी

तिथेच थांबली,

चिवचिव करत

ओरडू लागली.

 

हे दाणे फक्त

मीच खाणार,

किती हाकलले

पुन्हा येणार.


म्हणे पिल्लांना

भूक लागली,

सारी दुकाने

आता बंद झाली.


चोचीमध्ये आता

भरून दाणा,

चिमणी उडून

गेली रानावना.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children