छळतोय गार वारा
छळतोय गार वारा
छळतोय गार वारा
धुंद आसमंत सारा
वेडावूनी कां जीवाला
तनी उठला शहारा
खुल्या केश कुंतलांना
उधळी मुजोर वारा
धुंद गंध रातराणी
पसरे सुवास सारा
दिव्य मखमली स्पर्श
दाटला गंधार सारा
झंकारली ही सतार
छेडील्या अबोल तारा
रात्र पूर्ण चांदण्याची
करी चंद्र ही इशारा
द्वैतातल्या मिलनाचा
बघ पाहतो नजारा
आसुसल्या दोन जीवा
कसा लाभला किनारा
गुज गोड मिलनाचे
सांगतो गंधीत वारा

