चहा आणि पाऊस
चहा आणि पाऊस
चहाचं आणि पावसाचं,
काय नातं आहे कोणास ठाऊक...
तसंच तुझ्यामाझ्यात तरी,
काय गुंता आहे
ना तूला ना मला ठाऊक...
चहा नक्कीच छान वाटतो,
रिमझिम बरसत्या पावसा सोबत,
पण त्याहून भारी वाटतो,
भिजल्या अंगाने तुझ्या सोबत...
मी मोह म्हणतं नाही पावसाचा,
व्यसनही चहाचे नाही,
छंद आहे तुझ्या सोबतीचा,
जो सहज कुणाला लाभत नाही...
