चेहरा एकच आईचा
चेहरा एकच आईचा
नऊ महिने जिने मला उदरात वाढविले
अनेक यातनांचे अडथळे जिने पार केले
आणि या विलोभनीय सृष्टीचे दर्शन दिले
जिच्यामुळे मला समाजात एक नाव मिळाले
असा जो चेहरा मायेचा तो म्हणजे एकच माझ्या आईचा II
जिने दूध भाताचे घास मला भरविले
इवल्याशा बोटाला धरून जिने चालायला शिकवले
निज निज बाळा म्हणून जिने अंगाई गीत गायले
उन्हात पदराच्या सावलीत आणि रात्रीच्या अंधारात मायेने वाढविले
असा जो चेहरा मायेचा तो म्हणजे एकच माझ्या आईचा II
जिने हातात पट्टीची काठी घेऊन अ आईचा शिकविले
लसणाच्या मिरचीच्या जोडीने जिच्या चुलीवरील भाकरिने मला घडविले
अंगणवाडीपासून महाविद्यालयाची पायरी मला चढविले
चुकीच्या गोष्टींना माफ करून जिने प्रेमाचे डोंगर उभे केले
असा जो चेहरा मायेचा तो म्हणजे एकच माझ्या आईचा II
भर उन्हापावसात जिने काबाड कष्ट केले
रात्रीचा दिवस करून जिने आपले शरीर झिजवले
कुटूंबाचा आधारस्तंभ बनून जिने नात्यांना जपले
समाजाची बंधन झुगारून माणूस म्हणून मला घडविले
असा जो चेहरा मायेचा तो म्हणजे एकच माझ्या आईचा II
मंदिराचा कळस तू अंगणातील तुळस तू
सूर्याची तीव्रता तू चंद्राची शीतलता तू
ह्रदयाची संवेदना तू जखमेवरची खपली तू
रडता रडता हसविणारी जगण्याच्या आधार तू
असा जो चेहरा मायेचा तो म्हणजे एकच माझ्या आईचा II