चैत्राची पहाट
चैत्राची पहाट
चैत्राची सोनेरी पहाट
मांगल्याचे तेज ल्याली
अनुपम झळाळी लेवूनी
अमृतघट तृप्त प्याली
गुढी उभारून मायेची
कडूलिंब डहाळी सजली
गाठीचा गोडवा घेवूनी
मायमराठीत संस्कृती भिजली
आनंदाची उधळण करूनी
सप्तरंगात पहाट नाहली
उत्सवाच्या सोहळ्यात
सान-थोरही सुखी जाहली
यशाची घेऊनी उत्तुंग भरारी
कर्तृत्वाची दिशा उजळली
दिवस सोनेरी लखलखला
नैराश्याची निशा मावळली
आकांक्षांच्या किरणोत्सर्गाने
जीवनी सुखाची बरसात झाली
आनंदाची उधळण करीत
पाडव्याची सोनेरी पहाट आली
