STORYMIRROR

Jyoti gosavi

Tragedy

4  

Jyoti gosavi

Tragedy

चार भिंतीतील स्मशान पाहे

चार भिंतीतील स्मशान पाहे

1 min
346

कधी काळी येथे

जीवन अंकुरत होते

तान्ह्या बाळाचे रडणे

येथे बहरत होते


मरणाच्या दारात येथे

मिळत होती संजीवनी

कित्येकांचे पुसून अश्रू

हास्य आणिले जीवनी


येथे अविरत मिळत होती

रुग्णांसाठी सेवा

तत्पर येथील सेवकवर्ग

हाच समाधानाचा ठेवा


एका काळ रात्री येथे

दहशतवादी हल्ला झाला

होत्या नव्हत्या सेवकांसहीत

रुग्णांनाही टिपून गेला


तेव्हापासून रुग्णालय हे

व्हेंटी वरती जगते आहे

जगते कसले हे तर

चार भिंतीतील स्मशान आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy