चांदणे मज पोळते
चांदणे मज पोळते


काळोखी अवसेची धुंद रात पावसाची
साथ तुझी आठवते परडी ह्या काळजाची
वेचली फुले तुला धुंद गंध पाठवते....१.
चंद्र हसे अंबरी शरदातील रात तरी
ग्रीष्म तुझ्या विरहाचा चांदणे मज पोळते....२.
शेज सुनी एकली मी पाश ना तव रेशमी
रक्तातील आग सख्या रक्तातची गोठवते.....३.