Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Chandan Pawar

Abstract Romance

3  

Chandan Pawar

Abstract Romance

बॉल म्हणाला बॅटला .......

बॉल म्हणाला बॅटला .......

1 min
469


बॉल म्हणाला बॅटला

तू माझ्याशी लग्न करशील ?

पण मी पळू मैदानावर

तेव्हा तू काय करशील ?


वन डे, टेस्ट ,ट्वेंटी-ट्वेंटीच्या नावाने

तुझ्या माझ्यात दंगा आहे ;

ग्राउंड, पीच, क्रिज वरच

वाहणारी आपली गंगा आहे .


तुला मी टच केल्यावर

तू लाजेने चूर चूर होते ;

हाऊज दाट म्हणत सर्वांच्या

तना -मनात खाज सुटते .


कधीकधी सततच्या नोबॉलमुळे

तुला माझा वीट येतो ;

तुला खुलवण्यासाठी तेव्हा

मी तुला फ्री-हीट देतो .


खेळाचा नियम मधून तु

"पॉवर प्ले "ला राजी असते ;

दुसऱ्याच्या हातात हात देऊन

तुझी तुफान फटकेबाजी असते .

वळणारी पीच जणू

माझी इंटरव्यू घेते ;

मी रागावून चिडलो

तर तू रिव्यू घेते .


आपल्या हालचालींवर लक्ष

ठेवणारे सारे कावळे आहेत

मैदानावर माझ्यामागे धावणारे

अकराही जण बावळे आहेत.


आपला खेळ स्पॉट- मॅच

फिक्सिंगच्या पाय आहे ;

क्रिकेटच्या खेळावर आता

बुकिंची काळी माया आहे.


तुझे माझे भक्त वेडे म्हणून

त्याची भक्ती वेंधळी आहे ;

क्षणिक भेटूनही न दुभांगणारी

आपली प्रित आंधळी आहे.



Rate this content
Log in