STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

बंदिस्त मन

बंदिस्त मन

1 min
248

आज आठवे ते दिवस 

मन मोकळे वावरणारे, 

चार भिंतीत अडकून 

मनास समजुती घालणारे..... 


महामारी कोरोना आदीचे 

पूर्वीचे ते मनसोक्त दिवस, 

पाहुणे रावळे जमलेले 

होते आम्हास खूप खास..... 


उत्सवांवर नव्हती बंदी 

साजरे करे सारे सण, 

नवचैतन्याने भरलेले 

आठवणीतले नाजूक क्षण...... 


स्वैरपणे फिरणारे 

आज आहेत बंदिस्त, 

काळजी घेवून स्वतःची 

शरीरास ठेवे तंदुरुस्त......


वर्तमानाने शिकवलेले धडे 

भविष्यात आपणास सुधारे, 

चांगल्या सवयी अवलंबण्याने

आपलेच जीवन बहरे......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational