STORYMIRROR

Mina Shelke

Inspirational

3.3  

Mina Shelke

Inspirational

बंधमुक्त

बंधमुक्त

1 min
1.4K


।। ☘बंधमुक्त ☘।।

काय अर्थ लावायचे ,काढायचे

तेवढे खुशाल काढा ....,

काही फरक पडणार नाहीये मला...!,


ठरलयं माझं काय ते ठरवायचं

आयुष्याच्या शेवटचा टप्प्यावर

अगदी बिनधास्त जगायचं...

नकोत त्या काळज्या अन,

फुकटच्या विवंचना...

ज्याची कदर नाही कुणा...


मुक्त झालीय तुझ्या नजरकैदेतून

तोडलेत साऱ्या नात्यांचे बंध

ज्यांना कधीच नव्हती खंत...

काळासोबत चालायचे मला...

मस्त मस्त ड्रेसिंग ...

हलकासा मेकअप ...

छान छान स्माईल...


पुन्हा जागवायचं ,

आरशात पाहून लाजायचं

बंद कोपऱ्याला साद घालायची

स्वतः वरचं खुश होऊन....

मस्त गिरकी घ्यायची....

कोण काय म्हणेल ...

अजिबात लक्ष नाही द्यायचं ...

मस्तीत पण शिस्तीत जगायचं...


हवं ते खाणं,भटकणं

आनंदात नाचणं,गाणं

दुःखाला कट मारणं,खळाळून हसणं ...

जे दुसऱ्या कुणाच्या नजरेत होतं जेरबंद

हरणं ,झुरणं ,कुढणं सारं सारं काही बंधमुक्त

जोपासणार दबलेले अधुरे छंद...


पिंजऱ्यात कोंडलेलं मन

मुक्तपणे विहरणार स्वच्छंद

सा...! लागलायं आता वरचा ...

आपुल्याचं मस्तीत , आपुल्याचं मर्जीत

आयुष्याची संध्याकाळ सजणार आहे...

शांत शितल मन गाभाऱ्यात

मोकळा श्वास घेणार आहे...

कातरवेळ आता फुलणारं आहे...

काळोखाच्या कुशीत नाही तर ...


लख्ख प्रकाशात उजळून निघणार आहे ...

उचलला स्वतःच्याचं सुखाचा विडा

कुठलाच मनात नाही तिढा ...

ओलवणार नाही पापणी कडा

फक्त आनंदश्रुंचा घालायचा सडा ...

हरवलेलं अस्तित्व नव्याने

जगायचे आहे पुन्हा...

हक्क आहे तो माझा...

नसेल हो कदापि गुन्हा...

काय अर्थ काढायचा तो

खुशाल काढा....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational