STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

बंध हा प्रीतीचा

बंध हा प्रीतीचा

1 min
2.7K


फरक आहे प्रीतीचा

फरक आहे नात्याचा

तू अनंत असण्याचा

मी क्षणमात्र असण्याचा

नयनात मी सारे बोलून जाते

शब्दानेही न समजणार तू अनामिक

तुज काहीच नाही कळते

बोलले तरी हसतोस खट्याळ

मग माझेच रुसने भाव खाऊन जाते

तेच तर अंतर आहे

तू दिगंतात अन मी पूर्वार्ध असण्याचा

फरक आहे प्रीतीचा

फरक आहे नात्याचा

तुजी काळजी करताना माझी काहिली झालेली

तुझ्या डोळ्यात माझी आस मी कधीच न पाहिलेली

मी रागावून सोडता हात

तू करतोस प्रेमाची बरसात

मीच तुझ्या हक्काची सांगिनी असल्याचा

करतोस निष्पाप बहाणा

कान पकडूनि करतोस विनवणी अन

डोळ्यातल्या खाणाखुणा

मग सोडून देते मीही अट्टाहास रुसून राहण्याचा

फरक आहे प्रीतीचा

फरक आहे नात्याचा

प्रेम जरी हे वेगवेगळे

बंध एक प्रीतीच्या धाग्याचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance