भूमिका
भूमिका
अंदाज माणसाचा अजिबात येत नाही,
जो वाटतो जवळचा तो दाद देत नाही!
स्वार्थात आज येथे गेले डुबून सारे,
लाभाशिवाय कोणी धावून येत नाही!
जमवायचे कितीसे कोणास भान नाही,
सोडून जायचे धन कोणीच नेत नाही!
प्यालो कधी न मदिरा ना पाजली कुणाला,
व्यसनास फालतू बघ लावून घेत नाही!
आयुष्य लाभलेले घ्यावे जगून थोडे,
घालावयास वाया ते काय रेत नाही!
फसणे नि फसविणे हे वाईट कृत्य आहे,
फसलो जरी कधी मी फसवाव बेत नाही!
समजून सांगताना होतो कठोर थोडा,
पण भावना दुखावी या भूमिकेत नाही!
