STORYMIRROR

Raakesh More

Romance Tragedy Others

3  

Raakesh More

Romance Tragedy Others

भ्रमात तू राहू दे

भ्रमात तू राहू दे

1 min
118

आज मला माझ्या

भ्रमात तू राहू दे 

तुझं प्रेम माझ्या 

नजरेने पाहू दे || 0 ||

 

करतोय तुझ्यावर मी 

सुंदर काव्य इथे आज 

आहेस तू सखे खरंच 

सौंदर्याचा एक ताज 

काव्य असं प्रेमाचं 

तूला आज वाहू दे 

तुझं प्रेम माझ्या 

नजरेने पाहू दे || 1 ||

 

करतोय मी तुझ्यावर 

सुंदर गीत एक असं 

फुलासाठी भवरा 

गुणगुणतो बागेत जसं 

प्रेमगीत तुझं हे 

मला आज गाऊ दे 

तुझं प्रेम माझ्या 

नजरेने पाहू दे || 2 ||

 

वर्षाव प्रेमाचा तू 

कर आज इथे असा 

मेघांच्या गडगडाटात 

फसे कोणी इथे जसा 

प्रेमात तूझ्या तू प्रिये 

चिंब चिंब न्हाऊ दे 

तुझं प्रेम माझ्या 

नजरेने पाहू दे || 3 ||

 

वात तूझ्या प्रेमाची 

जळत आहे माझ्या मनी 

माझ्यासारखा मीच आहे 

या जगी एक धनी 

मनी तुझ्या प्रेमाची 

वात आज लावू दे 

तुझं प्रेम माझ्या 

नजरेने पाहू दे || 4 ||

 

प्रेम तुझं आहे सखे 

नंदनवन असे माझं 

तूच या दुनियेत

सखे आहेस धन माझं 

काही काळ या रम्य 

स्वर्गात जाऊ दे 

तुझं प्रेम माझ्या 

नजरेने पाहू दे || 5 ||

 

व्याख्या एक वेगळी 

मी आज मांडतो 

मनातली दडलेली 

बात आज सांगतो 

प्रेम काय असतं हे 

जगाला दावू दे 

तुझं प्रेम माझ्या 

नजरेने पाहू दे || 6 ||

 

प्रेम तुझं माझ्या सखे 

मनी धावत आहे 

तुझंच प्रेम माझ्या सखे 

मनी धावत आहे 

या रन वे वर तू 

मला आज धावू दे 

तुझं प्रेम माझ्या 

नजरेने पाहू दे || 7 ||

 

मनी तूझ्या रूपाची 

प्रतिमा ही वसली 

तूच माझ्या हृदयात 

सखे आज वसली 

रूप तुझं हे सखे 

मना आज भावू दे 

तुझं प्रेम माझ्या 

नजरेने पाहू दे || 8 ||

 

खूप धुंद मस्त 

जीवन मी जगत आहे 

सावली बनून 

मी तुझ्या लगत आहे 

थोडी तूझ्या प्रेमाची 

वेदना ही साहू दे 

तुझं प्रेम माझ्या 

नजरेने पाहू दे || 9 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance