STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Fantasy Inspirational

3  

sarika k Aiwale

Romance Fantasy Inspirational

बहरली सांजवेळ

बहरली सांजवेळ

1 min
164

माझ्या मनीचा

चंदावा खुलला अंगणी

तुळस चंदनी

बहरलीसे 

माझ्या मनीचा

मोगरा फुलला माळरानी

भावनांचा मनी

कुंचलासे 

माझ्या मनीची

प्रिती बहरली सांजवेळी

काहूर अवेळी

माजतसे 

मझ्या मनीचा

भाव झुरला हृदयी

असा निर्दयी

सजाणसे 

माझ्या मनीची

काय सांगू गती

खुळी प्रिती

वसलीसे 

बहरली सांजवेळ

हवेत पसरला गारवा

वाटे मारवा

ऐकलासे 

माझ्या मनीचा

सांज झुरतेसे अशी

चाहुल कशी

तुलानसे 

माझ्या अंगणी

बहरली सांजवेळी रातराणी

चकोरमनी चांदणी

भाळलीसे

बहरता सांज

अशी अनाहूत ओढमनी

प्रितिभाव तनी

जागतसे

बहरात सायली

कळी गुलाबी बहरली

सांजवेळी आतुरली

सरितासे 

जाता अस्तास

सुर्य सागरीच्या लाटा

सरिताही वाटा

भुलतसे

बहरात सांजवेळ

प्रिती मनी खुलते

क्षितिज हसते

तुझ्यासवे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance