बहरले प्रेम
बहरले प्रेम
बहरले प्रेम सख्या
तुझे अन् माझे
कासावीस जीव माझा
तुझ्या आठवणीत रमला ।।1।।
वाट सदा पाहते
तुझी रे सख्या
घायाळ त्या हरणी परी
येशील मज भेटावयास सख्या ।।2।।
सांज सकाळी तुज
मनी स्वप्नि पाहते
प्रेम ओढ ही
निरागस कोमल स्वच्छ येत सख्या ।।3।।

