STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Inspirational

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Inspirational

भिमरायाची लेखणी

भिमरायाची लेखणी

1 min
253

विषमतेच्या मुळावर प्रहार भीमरायाची लेखणी

समानतेची उगवती पहाट भीमरायाची लेखणी


शूद्र म्हणूनी हिणवले, गावाबाहेर त्यांना जगवले

राष्ट्रपती पदी बसवले तिने ती भीमरायची लेखणी


पाण्यासाठी तो फिरे दारोदार , झाली मानवता लाचार

त्याला केले आधिकारी अशी भीमरायाची लेखणी


जातीपातीच्या नावी भांडले रक्त किती त्यांचे सांडले

त्या रक्ताची सशक्त आरोळी असे भीमरायाची लेखणी


केले देशाला सशक्त, समृद्ध, एकसंघ वैभवशाली

केली राज्यघटनेची मांडणी ती भीमरायची लेखणी        


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational