STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational Others

भीमजयंती

भीमजयंती

1 min
12.3K

यंदाची भीमजयंती साजरी करू या

आपल्या घरी दीप लावू या


नको कोणती मिरवणूक नको नाच गाणे

अभ्यासाच्या नादात विसरू खाणे-पिणे


सर्वांपेक्षा वेगळी चला जयंती करू साजरी

दीप लावू ज्ञानाचा प्रकाश पसरेल दारोदारी


बाबांनी सांगितलं आम्हा उच्च शिक्षण घेत जावे

शिक्षण वाघिणीचं दूध आहे रोज ते पीत राहावे


शिक्षणानेच होईल तुझा मानसन्मान घरोघरी

दीप लावू ज्ञानाचा प्रकाश पसरेल दारोदारी


त्यांच्या पुण्याईने साऱ्यांचा एवढा विकास झाला

शिकून सवरून चारचौघात खरा शहाणा झाला


त्यांचे गुणगान गाईन प्राण आहे जोवरी

दीप लावू ज्ञानाचा प्रकाश पसरेल दारोदारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational