भेटशील का परत
भेटशील का परत
परतीच्या वाटेवर पीरतीची आठवन,
मनाच्या आगीत पीरमाची साठवन.
एकलकोंडा मी कळल नाही कधी कोन्हा,
भीती समोर बिचारा जीव माझा तान्हा.
जर तर च्या बाता मांडून उगीच गणित सोडवतोय,
शिल्लक मनात ठेऊन बाकीचच सगळ मिरवतोय.
वेळ आणी परिस्थिती दोन्ही हातात नाहीत,
जेव्हा होती तेव्हा काय केल माझ मलाच माहीत.
तू हवीच आहेस किंवा नाही अस काही न्हाई,
शेवटचच एकदा भेटण्याची आता झालीय घाई.
सगळ्या वर मात करतोय एक दीर्घ श्वास घेऊन,
कधीतरी त्याच ठिकाणी भेटशील का परत येउन.

