STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Romance

3  

Bhagyashri Chavan Patil

Romance

भेटशील का कधी?

भेटशील का कधी?

1 min
671

अनामिक ओढीने पावले पुढे ढकलत आहे

तुझ्या आठवणीत मन हे अगदी शांत आहे

त्या नदी पल्याड भेटशील का कधी??


असा सारखे का होत असेल बरे तू येणार असे वाटते

हृदयाची धडधड ही वाढते 

पण या जन्मी तरी पुन्हा भेट होईल का कधी??


मलाच असे सारखे वाटते की तुझ्या ही मनी तेच आहे

तु कधी स्वतःहून बोलला नाही पण तुझ्या ही मनी असेल ना

पण तु कधी सांगितला नाही असे वाटले का तुला कधी??


सगळच एकतर्फी होतं मान्य आहे पण तुला त्याची जाणीव होती

मी दिसले नाही की तगमग होत होती आता परत तशी

तगमग होईल का रे कधी??


तुला भेटायला मन आसुसलेले आहे तुला एकदा डोळे भरून 

पाहायचे आहे तुला मनात साठवायचे आहे

पण तू परत येशील का कधी??


देवाच्या मनात असेल तर आपली भेट ही नक्की होईल

अजांतेपणे का होईना पण एकदा भेट ही होईल

असे मला पक्के वाटते असे होईल ना कधी ना कधी??


तुला मी आठवण तरी आहे का नाही 

माझा चेहरा तुला आठवेल का नाही

जरी कधी भेटलीस तर ओळख तरी दाखवशील का कधी??


खरं तर चूक माझी होती ओळख नसतानाही ओढ मी निर्माण केली

कधी एकदा हसला बोलला असणार तेच मी मनी धरून ठेवलं

आता परत इतक्या वर्षांनंतर प्रथमच ओळख जुळून येईल का कधी??


परत येशील नाही येशील पण स्वप्नात मात्र नेहमी येत असतो

ओळख असल्या सारखी माझ्याशी मन भरून बोलतोस ही

पण आता ओळख ओळख पटवून घेशील का कधी??


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance