भेट
भेट
वाट पाहतोय मी तुझी
या रम्य सायंकाळी
हे निर्मळ जल खुणावते मज
येशील का तू कातरवेळी
आठवल्या मज भेटगाठी
मारल्या गप्पा किती या
बाकावरी, बहरलेल्या
विशाल वृक्षाखाली या
मनाच्या प्रवाहात आपण
कित्येकदा मनसोक्त पोहलो
घेतला आनंद,केली मैत्री
पाण्याशी, अन् बेधुंद जाहलो
आयुष्याची स्वप्ने किती
पहिली मी तुझ्या सवे
या निवांत स्थळी सदैव
आकाशी संचारे पक्ष्यांचे थवे
आज हे सारे तेच पूर्वीचे
दृश्य पण,सगळे भासे मज
उदास उदास गडे,राहिला
एकाकी बाक,त्याच छायेत आज
मनी आशा धरून आहे मी
हे सारे लवकरच संपणार आहे
सारे सारे चित्र आहे बदलणार
एक नवी संध्या वाट आपली पाहे

