STORYMIRROR

Subhash Charude

Romance

3  

Subhash Charude

Romance

भेट

भेट

1 min
14.6K


तव भेटीची मज लागलिया आस

तव भेटीच्या ओढीने होतो जीवास त्रास

तुझ्या भेटीच्या ओढीने खुप दुर गेलो

मज आसवांच्या सरीने ओलाचिंब झालो

तव भेटीपुढे होते आकाश ठेंगणे

तुझी भेट सदा घडो हेच एक मागणे

तव भेटीसाठी केले मी जीवाचे रान

तुझ्या भेटीने हरपले माझे देहभान

अधरावरती माझ्या तुझेच नाव येते

भेटीसाठी तुझ्या मन माझे वेडे होते

भेटीसाठी लागे मज जीवास घोर

तव भेटीने नाचतो माझ्या मनाचा मोर

तुझ्या मुखातील वचन सदा कानी पडो

तव भेटीचे भाग्य मज जन्मोजन्मी घडो

देहामध्ये माझ्या जरी नाही उरले त्राण

तुझी भेट होता मी सोडील पंचप्राण


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance