STORYMIRROR

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Tragedy

3  

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Tragedy

भेट

भेट

1 min
12K

एक भेटले श्वान दुजला.         

गुजगोष्टी त्या मुखामुखी.        

माणूस झाला दैत्य जणू हा.      

असं काही ते जणू बोलती ..1.


आपण असतो ईमानदार

माणूस गेला अधोगती. 

खावे ज्याचे त्या रक्षावे

हीच आपुली नितीमती ....2.


मानवतेचा म्हणे पुजारी.

करतो हत्या भ्रष्टाचार.

दिसता युवती सान बालिका.

करत तिच्यावर अत्याचार. ...3.


रात्री सारे मिळूनी भुंकतो.

एकजूट ही नकळे त्याला.

सुशिक्षित तो परी अडाणी.

प्रेम शब्द तो आज विसरला. ..4.


धर्म संकटी प्राण संकटी.

विसरुनी सारे हेवेदावे.

आणि लढावे एकपणाने. 

जैविक शत्रूला जिंकावे.  5.     


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Tragedy