भेट पहिली
भेट पहिली
तुझी नि माझी ती पहिली भेट,
कायमस्वरूपी राहिल ध्यानात,
तुझ्या गोड गोड बोलण्याने,
घर केले होते मनात.
सुंदर ते दिसणं,मनमोहक हसणं,
उगाचच तुझं ते मागंमागं फिरणं,
भेटायला बोलावून झाडामागे लपणं,
हळूच चोरून माझ्या कडे बघणं.
बघताना एकटक नजर झुकली खाली,
चेहऱ्यावर उमटली लाजेची ती लाली,
बोलायला दोघांनाही शब्दांची गरज नव्हती,
कारण,मनातली भावना ,
नजरेतूनच कळत होती.
नजरेतूनच कळत होती.

