भावनांचे मेघ
भावनांचे मेघ
तुझ्या अवकाशी भावनांचे मेघ दाटत नाही
जरी प्रवाही तरी जल ते आटत नाही
जरी दारात चातकासारखा मी असा
तृषार्थ ठेवूनी तू मजला भेटत नाही
सांग तुझ्या-माझ्यातल्या दुराव्याची
खंत कधीच का वाटत नाही?
करू नको चर्चा आपल्या नात्याची
पण अंतरी स्विकारणे का पटत नाही?
विझूनी गेला अग्नी हृदयीचा
का चिता अजूनी पेटत नाही?