भावना
भावना
भावनांचा येई पूर
भळाळा वाहती वेदना
आवरेना ओघ मनाचा
किती करावी याचना
ओघळती अश्रू गाली
भावना होई आरक्त
घालमेल या जीवाची
कितीही असो विरक्त
महापुरात जाती लव्हाळे
नको मन इतके कोवळे
वृक्षापरी खोल रुजावे
स्थिर मनाची पाळेमुळे
भाव वाढवा श्रद्धेचा
शरण त्या तथागताला
ओसरेल मळभ दुःखाचे
जाता शरण धम्माला
वाहतो वारा सगळीकडे
नसे बंधन दिन दिशेचे
वर खाली जाती भास
महत्त्व आहे साधनेला
