STORYMIRROR

Sandhya Vaidya

Tragedy

4  

Sandhya Vaidya

Tragedy

धिक्कार केला

धिक्कार केला

1 min
0

येथील माणसांनी किती अविचार केला

आणून सोबतिला तिचा धिक्कार केला


आताच कुठे उघडले त्यांनी त्यांचे डोळे

भुलवित त्या कळ्यांशी अनाचार केला


हारातल्या तु-यांनी सजविले त्यांचे गळे

हळुवार खुलवित त्यांनी अत्याचार केला


खुळ म्हणावे की सत्यता त्यांचे हे चाळे

विश्वासात घेत खोट्यांचा सत्कार केला

 

समाजाला विभागून लावनिया कोलीत

भगिनी वर्ग बेमालुमपणे लाचार केला


हत्या तर रोज होते क्षणोक्षणी वाणीचीही

शील भंगाने सगळीकडे अनाचार केला


उमलण्या आधी खुडून केले उद्ध्वस्तही

देत नारीला माते समान दर्जा प्रचार केला


बा भीमा तुझ्यामुळे शिकले तर खूप सारे

कसा अंधश्रद्धा अन अनितीने संचार केला


पाऊले लागलेत पडाया थोडेसे पुढे पुढे

यांनी खाजगीकरणाचा हा उच्चार केला

प्रा संध्या वैद्य 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy