भाऊबीज
भाऊबीज
दिपावली असे सण
सर्वांच्याच आवडीचा
आनंदाची उधळण
दावी रूप संस्कृतीचा
सण आहे चैतन्याचा
मांगल्याचा आनंदाचा
नाती बहरुन येता
ओढ लागे भेटण्याचा
बंधुराजा येईल घरी
पहा काढून रांगोळी
वाट पाहते भावाची
लावुनिया दीपओळी
घेई तबक हातात
निरांजन तेजाळून
करी औक्षण भावाचे
ऊर भरे ओवाळून
मुख चंद्र बहिणीचे
मोदे किती उजळले
माया करी आई सम
दोघे मनी आनंदले
प्रेमभावे देई भाऊ
बहिणीस उपहार
लागो न दृष्ट कधी
माझा भाऊ दिलदार
