भाऊ
भाऊ
षडयंत्र मस्तीचे भाऊ तुझे
आजही मज आठवते
बालपणीचे खोडकर क्षण तुझे
आजही ओठांवर हसु खुलवते
मस्ती मस्तीत भांडण करण
मला आजही चांगले स्मरते
व्हावे पुन्हा छोटेसे बहिण भाऊ आपण
मन आजही त्याच मायेत रमते
आज पुन्हा मागे जाऊन दादा
तुझ्या कुशीत रडावे वाटते
आई बाबा नसले जरी आता
तुझ्या सावलीत ही तीच छाया लाभते
असेच राहो बहरलेले आयुष्य तुझे
देवाला सदा हेच मागणे माझे असते
असेच राहो आपलं नातं मायेचं
तुझ्याकडे सदा हीच ओवाळणी मागते
