STORYMIRROR

Pareah Koli

Inspirational Others

3  

Pareah Koli

Inspirational Others

माय मराठी

माय मराठी

1 min
120

Hi, Hello पेक्षा आमच्या माय मराठीच्या

नमस्काराची शालीनताच लय भारी

Ohh च्या स्वरापेक्षा अरे देवा अन बापरे ची

भावनांत भिजलेली गोडवीच लय न्यारी


ज्ञानेश्वरी, भागवत, अभंगांच्या

भक्तिरसात नहाली ती संतांचिया द्वारी 

अमृताची सर ल्याली मराठी

मायेचा पाझर सदा तीच्या उदरी


भोळी भाबडी कधी रांगडी ती

खेळली माझ्या शिवबाच्या दरबारी

हर हर महादेवाच्या लकारीत तळपली

कधी मर्द मराठी मावळ्यांच्या तलावरी


उदो उदो होई तीचा चहुदीशी 

रोविला तीचा झेंडा पार अटकेपारी

कणाकणावर, मनामनावर अधिराज्य करून

दरवळते म्हराष्ट्राच्या घरघरात जणू कस्तुरी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational