भान
भान
कित्येकदा सांज वेडी आस मनी झंकारते
क्षणात गिणती श्वासाची का चाहुल बदलते
विरहणी च्या सयीचे भाव क्षितिजावरी पसरते
मनीचा चंद्र झाकोळता अर्थात नवी जाण येते
आसक्त नभीचा या सुर नयनी दाटूनिया येती
भान वर्याची सलगी कराया स्पंदने ही धावती
उजळल्या माळरानी काजवे काहूनी प्रकाशती
मन भ्रमराला मोहिनी आसक्त धरा थिजावती
चंद्र नभीचा झाकोळला अर्थ नवा या जाणिवेला
क्षण धुकयाच्या लयीत विरले भान मनीचे का शोधीती
