STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy

3  

Pandit Warade

Tragedy

भाकरीसाठी

भाकरीसाठी

1 min
359

वृत्त:- लज्जिता

(गालगा, गालगा, लगागागा)


सोडले गाव भाकरी साठी

सोडली लाज भाकरीसाठी


सोयरे, बायको, मुले, सारे

राखती स्वार्थ भाकरीसाठी


पावला धर्म कोणता नाही

कष्टलो मीच भाकरीसाठी


प्रेम नात्यात राहिले नाही 

भांडती रोज भाकरीसाठी


भूक पोटास लागते जेव्हा

'पंडिता' धाव भाकरीसाठी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy