भाग्य
भाग्य
हातांच्या रेषांवर कुठे लिहिले होते
भेटणे आपूले कुणी सांगितले होते
होतो रहात दोघे एका गावी तरीही
दुरावे आपल्यातले कुणी सांधले होते
नजरेस नजर भिडावी घडले नाही कधी
गाणे अंतरी भीडणारे कोणी गायले होते
हातात हात यावा, योग कधी न आला
हृदयाचे हृदयी मिळावे, कसे घडले होते
खूलून कधी न आला गुलाब तूझ्या गाली
काटे परी दोघांतले ते कुणी वेचले होते
पाहता तूला हिरवा रानवारा न बहकला
कस्तूरी अंतरास कुणी गंधीत केले होते
घडले वेगळे न काही अचानक वाटणारे
तरीही भेटताना शब्द ओठी थांबले होते
गाठी जन्मांतरीच्या ह्या ठरलेल्या होत्या
पाहता तूला क्षणीच मला कळले होते
गमले मला रहस्य ह्या हातांवरील रेषांचे
चेतनच्या शब्दांमध्येच ते लपले होते

