Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pranjali Kalbende

Abstract

2  

Pranjali Kalbende

Abstract

बेरोजगारी...

बेरोजगारी...

1 min
110


*कोरोनामय जनजीवन आजचे*

*वाढत्या बेरोजगारीला कारण*

*चिंताजनक परिस्थितीला सामोरे*

*जावे लागतेय प्रत्येक क्षण....* १


*खाजगी नोक-या चालल्या*

*एका क्षणात रोजगार जातोय*

*आधीच भयावह कोरोना आलाय*

*आर्थिक समस्याही जीव घेतेय.....* २


*कसा चालवावा प्रपंच?*

*कर्ता पुरुष बेहाल झाला*

*जीवनातुनच उठवायला जणू*

*कोरोना जिवाणू हा आला...* ३


*जीवनाच्या अर्ध्या वाटेवर*

*कशी नवी सुरुवात करावी*

*जम बसलेली जर नोकरी गेली*

*पुन्हा नवी उमेद कुठून आणावी...* ४


*शारीरिक संकटाबरोबरचं*

*मानसिकरित्या होतेय खच्चीकरण*

*आवक पैशाची अचानक थांबता*

*कसे करावे गरीबाने उदरभरण...* ५


*वाढत्या बेरोजगारीसाठी*

*मनाचे धैर्य एकवटायला हवे*

*शोधून स्वतःतले हुनर*

*जोडधंदे ही करावे आता नवे....* ६


*पैशाने पैसा वाढवावा*

*बचत रोजची हि सवय लावावी*

*आपत्कालीन स्थितीत मनुष्याजवळ*

*पुरेशी जमापुंजी नेहमी असावी...* ७


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract