बेभान असा हा वारा
बेभान असा हा वारा
बेभान असा हा वारा
थोडासा अल्लड व्हावा
हे गुज तिला सांगावे
तिनेच इशारा द्यावा ॥1॥
सारे थोडे बदलावे
मातीला ही यावा गंध
नकळत उमजावें
सारेच व्हावे मंद ॥2॥
मी शब्दही न बोलता
अश्रूनी गळा दाटावा
प्रेमाच्या कबुलीला
पाऊस उभा ठाकावा ॥3॥
अलगद याव्या सरी
तिने ही मस्त भिजावे
छोट्याशा बाळागत
कुशीत माझ्या निजावे ॥4॥

