STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Tragedy

4  

Neha Ranalkar(Nawate)

Tragedy

बदलली माणसे आता

बदलली माणसे आता

1 min
312

देवधर्म देवदर्शन वाढले

नाही विसरले यज्ञयाग पण 

माणसात देव आहे हेच विसरले

बदलली माणसे आता


परदेशी जाणे वाढले

आई वडीलांची काळजी सोडून

मातीशी असलेली नाळ विसरले

बदलली माणसे आता  


मोबाईल प्रेम वाढले

सुख दुःखा चे संभाषण नाही

प्रेमाचे दोन शब्द बोलणं विसरले

बदलली माणसे आता


लज्जास्पद वागणे वाढले

प्रेमाची जागा वासनेनं घेतली

स्रीचा सन्मान करणेच विसरले

बदलली माणसे आता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy