बधनांची बेडी
बधनांची बेडी
पायी बेडी बधनांची
मानू नकोस तू हार
तुझ्या खऱ्या अस्तित्वचा
लढा तूच लढणार
हाती घेऊन लेखणी
शब्द बनव हत्यार
शब्दांचीच गुरुकिल्ली
करी बंधनाला पार
लेखणीचे हे सामर्थ्य
करी शब्दांनी प्रहार
वेळोवेळी लेखणीच
देते मायेचा आधार
उतरले लेखणीत
शब्दभाव अंतरीचे
होता लेखणी जहाल
देई उत्तर प्रश्नाचे
