बाप्पाचा प्रश्न?
बाप्पाचा प्रश्न?
बाबा बाबा काय करावं मला कळेना
माझा अवतार मला सहवेना...!
माझा अवतार मला सहवेना...!
कोणी साखरेत साकारतो
गोड गोड माया म्हणून
मुंग्या येतात प्रसाद घेतो म्हणून
कोणी गुळात साकारतो
डोंगळे येतात डंख मारतात
गोड खायला मिळते म्हणून
कोणी धान्यात साकारतात
नुषी किडे येतात स्वाहा करतात
कोणी कडधान्यात साकारतात
भुंगे पोखरतात भक्ष्य म्हणून
कोणी प्लास्टर मध्ये साकारतात
पर्यावरणवाले येतात धावून
पर्यावरण रक्षण करायचे म्हणून
कोणी शाडूत साकारतात
प्रदूषण वाले येतात
नदी नाल्यांची काळजी म्हणून
कोणी लाल मातीत साकारतात
एक नवा उपक्रम घेऊन
निसर्ग संरक्षण करायचं म्हणून
कोणी नाण्यात साकारतात
इन्कम टॅक्सवाले येतात
ड्युटी म्हणून
आता काय राहीलय का
हेच मला काही कळेना झालंय
बाबा तुम्ही तरी सांगा मला
मी कोणत्या रुपात
माझ्या भक्तांना भेटायला जाऊ..?
आणि नेवैद्याचे मोदक आवडीने खाऊ..!
भोळे नाथ म्हणाले
तू चौदा विद्येचा अधिपती
चौसष्ट कलांचा स्वामी
तुला रे कसली अडचण...?
कोणत्याही रुपात तू शोभतोसच
भक्तांसाठी सहन कर बाबा थोडं
वर्षभर नाहीतरी कोण आठवत सांग बरं..!
मान दिला तर सहन थोडं करावं
आनंदात सामील होऊन आनंद द्यावं
हां,डॉल्बी कडे तेवढं फिरकू नको
कान बधीर होतील आणि
भक्ताची एखाद्या प्रार्थना ऐकू येणार नाही..!
जा बिनधास्त मजा कर आणि
लवकर ये, इथं पण काम पडलेत..!
लाडका बाप्पा आनंदला
रजा मंजूर झाली म्हणून
नाचत नाचत उड्या मारत घरी आला...!
उड्या मारत घरी आला...!
