STORYMIRROR

Chandanlal Bisen

Tragedy

3  

Chandanlal Bisen

Tragedy

बाप

बाप

1 min
213

बाप कुणाला कळलेच नाही

बापावर गुणगान कुणाचे नाही

कुटुंबाविषयी अमर्याद वात्सल्य

ते कुणाला जानता आलेच नाही..


बाप कुटुंबाचा असतो पोशिंदा

तो रात्रंदिवस करतो काम धंदा

कुटुंबातील सर्व सदस्यांची चिंता

कुटुंबीय स्वंरक्षण करितो सदा..


पायातील झिजवी चपला

फाटका ठेगुळालेला सदरा

स्वतः करी साधे विचरण

संतुष्टाने म्हणतो मी बरा..


बाप क्रोधीत दिसतो खरा

पण हृदयातून खूपच बरा

भल्याकरिताच दिसे क्रोधीत 

कळल्या नाही प्रेमाच्या धारा..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy