STORYMIRROR

Sudam Salunke

Children

3.2  

Sudam Salunke

Children

बाप म्हणजे काय असतो?

बाप म्हणजे काय असतो?

1 min
13.7K


बाप म्हणजे काय असतो

कुटुंबाचा आधारस्तंभ बाप असतो

बाप म्हणजे काय असतो

मुलाला जीवनभराची साथ बाप असतो

बाप म्हणजे काय असतो.

आपल्या मुलांचा मित्र बाप असतो

बाप म्हणजे काय असतो.

कुटूंबाचा मार्गदर्शक बाप असतो .

बाप म्हणजे काय असतो.

अहोरात्र कष्ट करणारा बाप असतो

बाप म्हणजे काय असतो.

स्वतः दुःख सोसून दुसऱ्यांना सुख देणारा

बाप असतो

बाप म्हणजे काय असतो

स्वतः अडाणी असून मुलांना शिकवणारा

बाप असतो

बाप म्हणजे काय असतो.

स्वतः फाटके नेसून मुलांची हौस पुरवणारा

बाप असतो

बाप म्हणजे काय असतो.

स्वतः उपाशी राहून कुटुंबाचे पोट भरणारा

बाप असतो

बाप म्हणजे काय असतो

स्वतःच्या आवडी निवडी बाजूला ठेवून

दुसऱ्यांची आवड पुरवणारा बाप असतो

बाप म्हणजे काय असतो.

स्वतःचे आजारपण बाजूला ठेऊन

कुटूंबाची काळजी घेणारा बाप असतो

बाप म्हणजे काय असतो.

पै पै जमवून घर सांभाळणारा बाप असतो

बाप म्हणजे काय असतो..

संकटांशी धीराने सामना करणारा बाप असतो

बाप म्हणजे काय असतो.

मुलीच्या लग्नात डोळे पाणावलेला बाप असतो

बाप म्हणजे काय असतो.

स्वतः उन्हातान्हात राबून सावली देणारा

बाप असतो

बाप म्हणजे काय असतो.

आई वडिलांची अखेर पर्यंत काळजी घेणारा बाप असतो

बाप म्हणजे काय असतो.

प्रेम, वात्सल्य, दयेचा सागर बाप असतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children