STORYMIRROR

Sudam Salunke

Others

2  

Sudam Salunke

Others

शिव काव्य

शिव काव्य

1 min
13.9K


परम प्रतापी ज्यांची ख्याती

होऊन गेले या जगती,

त्यांची महती वर्णू किती मी

होऊन गेले शिवछत्रपती।।

शिवनेरीवर जन्म जाहला

खूप खेळले मावळयांसंगती,

मासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता

स्वराज्य निर्माण केले या जगती।।

प्रजेला सुखी करण्याकरिता

अन्यायाशी लढले शिवछत्रपती,

जातपात वा धर्मभेद हा नाही मानला कुणाप्रती

असे  आदर्श राजे  होऊन गेले या जगती।।

बलाढ्य शत्रू असतानाही

झुकले नाही कुणापुढती,

शिवरायांच्या गनिमीकाव्याने

हैराण केले शत्रूला किती।।

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ शिवरायांची युद्धनीती

बलाढ्य शत्रूशी लढण्याकरता वापर केला वेळेवरती,

अनेक संकटे झेलीत स्वराज्य वाढविले या जगती

आयुष्यभर लढत राहिले देह ठेविला रायगडावरती।।

परमप्रतापी ज्याची ख्याती

होऊन गेले या जगती,

त्यांची महती वर्णू किती मी

 होऊन गेले शिवछत्रपती।।

 

 


Rate this content
Log in