" कोरोनो " के लिए ये करोनो
" कोरोनो " के लिए ये करोनो
काम धंदा सोडून गर्दीत फिरणे टाळा
गर्दीमध्ये जाताना मास्क लाव बाळा
तरच "कोरोनाच्या" संसर्गाला बसेल आळा ॥ १॥
नका लावू हात विनाकारण तोंडा आणि डोळा
सर्दी , खोकला झाला तर डॉक्टरकडे जा वेळोवेळा
तरच "कोरोनाच्या" संसर्गाला बसेल आळा ॥२॥
लहान मुल आणि वृद्धांना जपा या वेळा
लक्ष ठेवा त्यांच्यावर वेळोवेळा
तरच "कोरोनाच्या" संसर्गाला बसेल आळा ॥३॥
सुट्टी दिली मुलांना बंद केल्यात शाळा
अभ्यासाचा लावा त्यांना तुम्ह
ी लळा
तरच "कोरोनाच्या" संसर्गाला बसेल आळा ॥ ४॥
महत्वाच्या कामासाठी जा एक वेळा
विनाकारण नका फिरू गावातल्या गल्लीबोळा
तरच "कोरोनाच्या" संसर्गाला बसेल आळा ॥ ५॥
जाणवली लक्षण तर दवाखान्यात जा वेळोवेळा
नका लपवू आजाराला करा उपचार योग्य वेळा
तरच "कोरोनाच्या" संसर्गाला बसेल आळा ॥ ६॥
कोणत्याही समारंभात नका होऊ गोळा
शासनाने सांगितलेले लॉकडाऊनचे नियम तुम्ही पाळा
तरच "कोरोनाच्या" संसर्गाला बसेल आळा ॥ ७॥