STORYMIRROR

Vijay Sanap

Tragedy

3  

Vijay Sanap

Tragedy

बाप माझा

बाप माझा

1 min
14K


 बाप माझा

हाणे शेतात वखर

खातोय भाकर

उभ्यानं ।।

नेहमीच त्याच्या

असे जीवाची आबाळ

खांदयावर कुदळ

दिसतसे ।।

पाचवीला त्याच्या

सदा पुजलेले दुःख

तरीही सुख

मानतसे ।।

पोटाचा वणवा

कसा काय विझावा

सावकराचा बोलावा

नशीबात ।।

संसार तयाचा

दिसे जगाला फाटका

तरीही नेटका

नेहमीच ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy